Email: edupri.punezp@gmail.com
संदर्भिय विषयांन्वये शाळांना मान्यता प्रमाणपत्र देणेसाठी प्राथमिक/माध्यमिक शाळेने (इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी) करीता विहित नमुन्यातील स्व मान्यता प्रमाणपत्र (नमुना-2)मिळणेसाठी Self Declaration साठी नमुना-1 मध्ये खालील शाळेचा प्रस्ताव या कार्यालयास ऑनलाईन प्राप्त झालेला आहे.
संदर्भिय तरतुदीनुसार जिल्हा शिक्षणाधिकारी स्वयं प्रतिज्ञापन मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत अनुसूचीमध्ये विहित केलेली मानके व प्रमाणके आणि पोट -नियम (1)मध्ये नमूद केलेल्या शर्ती व परिपूर्ती यांची पडताळणी करण्यासाठी ज्या शाळांनी नमुना-1 मध्ये दावा सांगितलं असेल अशा शाळांची जागेवर जाऊन तपासणी करील. उक्त अधिकारी, एकतर स्वतः किंवा त्याला दुय्यम असलेल्या अधिकाऱ्या मार्फत अशा परिपूर्तीबाबत पडताळणी करील आणि विहित नमुन्यामध्ये अहवाल करील असे नमूद केले आहे. प्रस्तावासोबत दिलेल्या चेकलिस्ट प्रमाणे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.
उपरोक्त बाबीचा विचार करता वर नमूद केलेल्या शाळेने मागणी केलेल्या इयत्तासाठी व नमूद केलेल्या कालावधीसाठी नवीन/नूतनीकरण स्व मान्यता (नमुना-2) देणेबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.